Sadhan-Chikitsa ,साधन-चिकित्सा

  •  Sadhan-Chikitsa ,साधन-चिकित्सा
Award Winning Book

To buy Click on the link below


This book is considered to be VS Bendrey's first historical volume Many historians considered it to be a must-read the book for aspiring historians and researchers of Maratha history. Sadhan-Chikitsa serves as a concise introduction to Maratha history as well as a guide for researchers. In this book VS Bendrey provides the tools for conducting research in the field of Maratha History.  Babasaheb Purandare and many  prominent researchers and historians see great value in following the principles of research laid out in the book. 

Language -Marathi,
ISBN 9788195321650,  Pages: 304
Further enquiry-contact
bendreypublications@gmail.com
मला इतिहास संशोधनाचे प्राथमिक धडे बेंद्रे यांच्याकडून मिळाले. संशोधन क्षेत्रामध्ये पहिली पाऊले मी त्यांचे बोट धरूनच टाकली."साधना-चिकित्सा" हा ग्रंथ लिहून वा. सी. बेंद्रे हे महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यांच्या संशोधकांचे गुरुवर्य बनले आहेत. ज्याला इतिहासाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचे आहे, महाराष्ट्राच्या विशेषत: मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करायचे आहे, अशा प्रत्येकाने गुरुवर्य बेंद्रे यांचा हा ग्रंथ वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे, चिंतन आणि मनन केले पाहिजे. हा ग्रंथ इतिहाससंशोधनाची बायबल आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. इतके महत्त्वाचे आहे. शिवशाहीच्या साधनांचा चिकित्सा करणारा ग्रंथ असे मुळात या ग्रंथाचे स्वरूप आहे.
- *जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व संशोधक)*
ऐतिहासिक पत्रावर एक रेघ जरी ओढली तरी कागदपत्राचा प्रकार कोणता असतो, हे आपल्याला मराठी पत्रव्यवहारावरून समजते. याविषयी "साधन-चिकित्सा" हा अतिशय मौल्यवान असा ग्रंथ वा. सी. बेंद्रे यांनी लिहिला. त्याबद्दल त्यांचं फार मोठं कौतुक निश्चितपणे करायला पाहिजे. तो संशोधकांसाठी लिहिलेला ग्रंथ आहे. संशोधकांच्या हाती एखादा खजिना लागल्यासारखं पुस्तक त्यांनी त्यावेळेस लिहिलं होतं.
- *निनाद बेडेकर (ज्येष्ठ इतिहास संशोधक)*
त्यांचा "साधन-चिकित्सा" हा ग्रंथ किंबहुना विचार मला फार महत्त्वाचा वाटतो. एखादा शोध म्हणा किंवा एखादा काही नवीन सापडलेला विषय म्हणा, तो जर लोकांसमोर मांडायचा असेल तर त्याचा चिकित्सापूर्ण अभ्यास तसेच त्याचे पुरावे काय, तो समकालीन आहे का, तो विश्वसनीय आहे का, या सगळ्यांची चिकित्सा झाली पाहिजे आणि म्हणून बेंद्रे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणूनच बेंद्रे यांचे काम फार मोठे आहे.
इतिहासाच्या बाबतीतील ते एक थोर ऋषी होते. आपल्या आयुष्यात ऋषीतुल्य काम त्यांनी केलेले आहे. मी माझे भाग्य समजतो की, माझ्या आयुष्यातील चार क्षण त्यांच्या सहवासात व्यतीत करायला मला मिळाले आणि खूप काही शिकता आले. मी त्यांना गुरुस्थानी मानतो.
- *बाबासाहेब पुरंदरे (महाराष्ट्र भूषण व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक)*

  

Processor
Clockspeed 100mhz


  • $0.00

  • Ex Tax: $0.00

Tags: SadhanChikitsa, VS Bendrey, Maharashtra, Shivaji, Maratha, History